साहित्य : 1 वाटी वरीच्या तांदळाचा जाडसर रवा, दीड वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी नारळाचा चव, 6-7 वेलची, तूप.
कृती : वरी थोडा वेळ पाण्यात भिजवून नंतर संपूर्णपणे पाणी निथळून सुकवून घ्या. ही वर मिक्सरमध्ये भरड वाटून वरीचा रवा तयार करून घ्या. हा रवा तुपावर तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. दोन वाट्या पाण्यात गूळ व मीठ विरघळवून पाण्याला चांगली उकळी आणा. या पाण्यात भाजलेला वरीचा रवा टाका आणि मऊसर सांजा तयार करून घ्या. ताटाला व्यवस्थित
तूप लावून त्यावर पाव इंच जाडीनुसार सांजा थापून घ्या.
वर वेलची पूड व नारळाचा चव पसरवून थंड झाल्यावर वड्या पाडा. खांडवीच्या वड्या तयार.
Link Copied