Close

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि निक्कीमध्ये खडाजंगी, खेळ चाललाय रंगत ( Bigg Boss Marathi 5 Fight Between Ankita And Nikki Tamboli)

'बिग बॉस मराठी' आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियरपासूनच 'बिग बॉस' स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती 'बिग बॉस'प्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे. 'नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

Share this article