Close

बिग बॉस मराठी’च्या सदस्यांच्या ब्रेकफास्टचा आहे लॅव्हिश थाट, पण त्यासाठी करावे लागणार प्रयत्न खास ( Bigg Boss Marathi Contestant Special Task For Breakfast )

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचा 100 दिवसांचा प्रवास सुरू झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"गार्डन एरियामध्ये आपल्यासाठी एक लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे". 'बिग बॉस'ने लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याने स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी 'बिग बॉस'ने गार्डन एरियामध्ये लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलेली असते.

दरम्यान छोटा पुढारीला काही दिसत नसल्याने अरबाज त्याला उचलतो. त्यावेळी वर्षा ताई काय दिसलं असं छोटा पुढारीला विचारतात, त्यावर अरबाज म्हणतो,"स्वर्ग". त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एन्ट्री होते. काहीही न बोलता त्यांच्याकडे असलेला एक पेपर हे अनोळखे व्यक्ती घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर "Do NOT TOUCH" असं लिहिलेलं असतं".

घरातील सदस्यांना भूक लागलेली असून समोर दिसत असलेल्या ब्रेकफास्टच्या लॅव्हिश थाटावर ताव मारता येईल का? हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असेल? हे लवकरच समोर येईल.

Share this article