जिच्या अभिनय कौशल्याने सगळेच प्रेक्षक तिच कौतुक करतात अशी प्रतिभासंपन्न अभिनेत्री अमृता खानविलकर ! अमृता कायम तिच्या सोशल मीडिया मधून लाईफ अपडेट्स देताना दिसते नुकतीच ती दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेली असताना तिची आणि अदिती राव यांची खास भेट झाली. या खास भेटीचे क्षण फोटो मध्ये कॅप्चर करत तिने दोघींचा फोटो आपल्या सोशल मीडिया वर शेयर केला आहे.
अदिती आणि अमृता या दोघी फॅशन च्या सोबतीने अभिनय आणि फिटनेस मधून सगळ्यांना प्रेरणा देत असतात आणि या दोघींची भेट म्हणजे " दोन सुपर टॅलेंटड " अभिनेत्रीची ग्रेट भेट आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही.
दोघी त्यांच्या प्रेक्षकांना कायम मनोरंजन करत असतात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात.
अमृता आणि अदिती या दोघी या फोटो मध्ये कमालीच्या सुंदर दिसतात ! ही जोडी प्रेक्षकांना एकत्र बघायला आवडेल का ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.