Close

 देबिना आणि गुरमितची मुलींसह पावसाळी सहल (Debina Bonnerjee Enjoys Monsoon Vacation With Gurmeet Choudhary And Her Little Princess)

देबिना बोनर्जीने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती दोन तिच्या राजकन्या लियाना आणि दिविशा सोबत आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा एन्जॉय करत आहे. देबिना सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि बरेचदा तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स, तिच्या मुलींसोबतचे अनमोल क्षण शेअर करत असते. अभिनेत्री सध्या तिच्या दोन्ही राजकन्यांसोबत तिच्या पावसाळी सुट्टीचा आनंद घेत आहे, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

देबिना मान्सूनच्या सुट्टीसाठी एका रिसॉर्टमध्ये पोहोचली आहे, जिथे ती तिच्या कुटुंबासोबत मस्ती करत आहे. मागील अनेक सुट्टीत ती आपल्या मुलींसोबत एकटीच गेली होती, यावेळी गुरमीतही तिच्यासोबत आहे. देबिनाने आता तिच्या व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मुली आणि पती गुरमीत चौधरी दोघांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती तिच्या कुटुंबासोबत स्विमिंग पूलमध्ये आहे, कुठे ती लॉनमध्ये आहे, तर कुठे ती पावसात चहा आणि पकोड्यांचा आस्वाद घेत आहे. कुठेतरी गुरमीतसोबत रोमँटिक सुट्टीचा आनंद घेत आहे.

नेहमीप्रमाणेच या छोट्या सुट्टीत तिची आई देखील त्यांच्यासोबत आली आहे आणि स्वयंपाकघरात या सर्वांसाठी काहीतरी खास तयार करताना दिसत आहे.

देबिनाची ही व्हेकेशन पिक्चर्स इतकी रिफ्रेशिंग आहेत की ती पाहिल्यानंतर प्रत्येकालाच मान्सून स्पेशल बनवल्यासारखं वाटतं. चाहते आता तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि तिच्या पालकत्वाच्या कौशल्याची आणि कौटुंबिक बंधनाची प्रशंसा करत आहेत

गुरमीत चौधरी सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर ८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या कमांडर करण सक्सेना या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. गुरमीत चौधरीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. या वेबसीरिजमध्ये तो रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. देबिना बॅनर्जीबद्दल सांगायचे तर, ती लवकरच तिचा स्वतःचा पॉडकास्ट शो घेऊन येत आहे, ज्याचे शीर्षक देबिना बोनर्जी शो असेल, ज्यामध्ये ती तिच्या पाहुण्यांशी गरोदरपणाच्या प्रवासापासून ते मातृत्वाच्या अनुभवापर्यंत प्रत्येक गोष्टीवर बोलेल.

Share this article