आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता आणि चाहते विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट आता थिएटरमध्ये दाखल झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन, ॲमेझॉन प्राइम आणि लिओ मीडिया कलेक्टिव्ह निर्मित या चित्रपटाची कथा लोकांना आवडतेय.
त्याचबरोबर काही सेलिब्रिटींनी चित्रपटाचा रिव्ह्यूही शेअर केला आहे. सुष्मिता सेनची मुलगी रिनी सेन हिने देखील या चित्रपटात इंटर्न असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तिने स्वतः ही माहिती दिली असून तिचा अनुभवही शेअर केला आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेनच्या मुलीने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर स्क्रिनिंगपासून सेटपर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती दिग्दर्शकासोबत पोज देताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये तिने स्क्रीनची झलक दाखवली आहे, जिथे तिचे नाव क्रेडिट्समध्ये दिसत आहे. उर्वरित फोटोंमध्ये ती पडद्यामागील झलक देत आहे.
हे फोटो शेअर करताना रिनीने लिहिले की, बॅड न्यूज या चित्रपटासाठी काम करणे अतिशय समाधानकारक होते. हा अनुभव नवीनच शाळेत जाण्यासारखा होता, किंबहूना त्याहूनही चांगला म्हणता येईल. आमच्या आश्चर्यकारक क्रूने मला खूप काही शिकवले आहे आणि ते सर्व माझे आजीवन मित्र बनले आहेत. माझे दिग्दर्शक आनंद तिवारी यांची मी खूप आभारी आहे.
तिने पुढे लिहिलेय की, या संधीसाठी धन्यवाद आणि मी तुमच्या दिग्दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. यानंतर तिने काही लोकांना टॅग केले आणि लिहिले, मला इतकी चांगली सुरुवात करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मला शिकवल्याबद्दल आणि सर्व आठवणींसाठी खूप खूप धन्यवाद.
तूम्ही माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहात. हे शक्य केल्याबद्दल रेश्मा शेट्टी मॅडमचे विशेष आभार. आपण टीमवर्कने हे करून दाखवले. बॅड न्यूज चित्रपटासाठी शुभेच्छा.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)