कॅप्सिकम बटाटा पिझ्झा
साहित्य : 4 लहान चिरलेले बटाटे, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, 2-3 चमचे तेल. टॉपिंगसाठी: 2-3 चमचे टोमॅटो सॉस, मशरूम आणि सिमला मिरचीचे तुकडे, काळे ऑलिव्ह, 3-4 चमचे किसलेले चीज.
कृती : बटाटे किसून घ्या. मीठ आणि काळी मिरी घाला. कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात किसलेला बटाटा घाला त्याला दाबून गोल आकार द्या. झाकण ठेवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. बटाट्याचा तयार पॅनकेक परतवून दुसर्या बाजूलाही चांगले शेका. गरज असल्यास कडांच्या बाजूने थोडे तेल लावा. बटाट्याचा पॅनकेक हीटप्रूफ प्लेटमध्ये ठेवा आणि वर टोमॅटो सॉस घाला. किसलेले चीज घालून वर सिमला मिरची आणि काळ्या ऑलिव्हने सजवा. 10 मिनिटे ग्रिल किंवा बेक करून गरमागरम सर्व्ह करा.
डोकळीची भाजी
साहित्य: डोकळीसाठी: 50 ग्रॅम बेसन, 1/4 टीस्पून हळद, 1 उकडलेला मॅश केलेला बटाटा, अर्धा एव्हरेस्ट काश्मिरी तिखट, 2 चिमूट हिंग, 3 चमचे तेल, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
इतर साहित्य: 2 बटाटे, 1 वांगी, 50 ग्रॅम पापडीची भाजी, 3 चमचे तेल, 2 चिमूट हिंग, 2 चमचे तिखट, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून बडीशेप पावडर, 50 मिली तेल, चवीनुसार मीठ.
कृती : डोकळीचे सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालून कणीक मळून घ्या. लहान गोळे बनवा. तळव्याने दाबून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. कढईत तेल गरम करा. जिरे आणि हिंग टाका. सर्व भाज्या, मसाले आणि थोडे पाणी घालून शिजवा. बटाटे मॅश करा आणि भाज्यांमध्ये मिसळा आणि 3-4 मिनिटे शिजवा. डोकळी बरोबर सर्व्ह करा.