Close

हराभरा कबाब आणि बटाट्याचे मुटके (Green Kebabs And Potato Muttas)

हराभरा कबाब
साहित्य: 2-3 उकडलेले व मॅश केलेले बटाटे, अर्धी वाटी जाडसर वाटलेले हिरवे वाटाणे, 1 जुडी पालक (उकडून त्यातील पाणी गाळून घेतलेले), 1 कप कोथिंबीर, 1 किसलेली सिमला मिरची, 1 चमचे आले-मिरची-लसूण पेस्ट, 1/4 चमचे चाट मसाला, 3 ब्रेड क्रम्प्स, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 चमचे किसलेले पनीर.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून गोळे करून तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

बटाट्याचे मुटके
साहित्य: अर्धा किलो बटाटे, अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 वाट्या गव्हाचे पीठ, 2 चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी-जिरे ,हिंग, 5-6 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून बेसन.
कृती : बटाटे सोलून किसून घ्या. गव्हाच्या पिठात बेसन, किसलेला बटाटा, लाल तिखट, चवीनुसार मीठ ,चिरलेली कोथिंबीर आणि हळद एकत्र करून पीठ मळून घ्या. आता या पिठाचे मुटके बनवा. त्यांना इडलीप्रमाणे वाफवून घ्या किंवा रोल करून वाफवून घ्या. थंड झाल्यावर कापा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि हिंग टाकून फोडणी द्या, किसलेले खोबरे व चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.

Share this article