Close

‘पंचायत’ फेम अभिनेत्याच्या नव्या सिरिजचा ओटीटीवर धुमाकूळ (Actor Jitendra Kumar New Series Kota Factory S3)

'पंचायत' या लोकप्रिय वेबसिरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आणखी एव वेबसिरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालते आहे. या वेबसिरिजमधील जितेंद्र कुमारच्या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे. कोणती आहे ही वेबसिरिज?

अॅमेझॉन प्राइमवरील 'पंचायत' वेबसिरिज तुम्ही पाहिली आहे का? या वेबसिरिजमधील सचिवजी अर्थातच अभिनेता जितेंद्र कुमार याच्या या वेबसिरिजमधील कामाचं प्रचंड कौतुक झालं. यानंतर आता जितेंद्र कुमारची आणखी एक वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवरची 'कोटा फॅक्ट्री' या वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'कोटा फॅक्ट्री 3' या वेबसिरिजमधील जितेंद्र कुमारच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. या वेबसिरिजमध्ये जीतू भैय्या हे पात्र जितेंद्रने साकारलं आहे. 'कोटा फॅक्ट्री 3' ही वेबसिरिज शिक्षण क्षेत्रावर आधारित आहे. यात कोटामध्ये चालत असलेल्या क्लासेसची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जितेंद्र कुमारने जीतू भैय्या हे पात्र साकारलं आहे.

जितेंद्र कुमार हा हिंदी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. पंचायत या वेबसिरिजमध्ये त्याने सचिवजी हे पात्र साकारलं आहे. तर 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये त्याने अमन त्रिपाठी हे पात्र साकारलं आहे.

Share this article