प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने त्याला आपल्या मिठीत घेतले आहे. दोघेही तलावासमोर एकत्र पोज देत आहेत.
निकने आपल्या लाडक्या बोयकोला जवळ धरुन पोज दिली आहे. त्यानंतर मालतीसोबतचा एक फोटो आहे. पुढे प्रियांकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या पायाला झालेल्या जखमा दाखवतेय. प्रियांकाने आपल्या आईसोबतचेही काही फोटो शेअर केले.
प्रियांका सध्या ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान तिची मुलगी मालतीही सोबत होती. प्रियांका अनेकदा तिच्या सोशल मीडिया हॅण्डल द्वारे वेगवेगळे अपडेट शेअर करत असते.
नुकतीच जेव्हा तिला दुखापत झाली होती तेव्हा तिने वेदना कमी होण्यासाठी पायाला लसूण चोळलेला. कमेंटमध्या चाहते तिला वेगवेगळे उपाय सांगत आहेत.