रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न जुलै महिन्यात होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सर्वत्र आहे. त्यांच्या दोघांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका देऊन मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. हा विवाह मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाचे स्वतः अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी आमंत्रण देत आहेत. मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी आणि राधिकासोबत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुकेश अंबानी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुनेने राधिका मर्चंटला सुंदर मुर्ती दिल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुकेश अंबानी यांनी दिले आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे. त्यांच्या दोन्ही प्री वेडिंग सेलिब्रेशनचा गाजावाजा इतका मोठा होता की आता प्रत्यक्ष लग्नसोहळा कसा असेल, याची कल्पनाही आपण करु शकत नाही.