काही दिवसापासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट शेअर करत होती. यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची हिंट तिच्या चाहत्यांना मिळाली होती. सईने तिच्या वाढदिवसानिमित्त एका खास गोष्टीची घोषणा केली आहे. सईने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. सईने तिच्या वाढिवसानिमित्त ‘मॅडम एस’ (madame S) हा Merchandise ब्रँड लाँच केला आहे. अगदीच हटके असं या ब्रँडचं नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच खास आहे. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’ असा याचा अर्थ आहे.
सईसाठी २०२४ हे वर्ष अगदीच खास आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत असते. आता ती तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. सईने नवा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. या सगळ्याबाबत सई बोलती झाली. ब्रँड लाँच करणं, ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण या बँडच्या निमित्ताने कायम आपल्या फॅन्ससोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँडमुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती आणि म्हणून हा ब्रँड लाँच होतोय, असं सई म्हणाली.
‘मॅडम एस’ हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणून फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे. या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील, यात शंका नाही. मी उद्योजिका फक्त पेपरवर झाली. पण मानसिकरित्या ते काही पटत नाही. तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल. असंच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे, असंही सई ताम्हणकर हिने म्हटलं आहे.
ब्रँडचं नाव काय असावं हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राने याला छान असं माझ्या पर्सनालीटीला शोभेल असं नाव सुचवलं आहे. यातून ‘मॅडम एस’ हा Merchandise ब्रँड आम्ही लाँच करतोय. क्वीन ऑफ स्यासी ट्यूडसारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या Merchandise ला मिळालं आहे आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेन, असं सई म्हणाली.
अभिनेत्री सई ताम्हणकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत गाजलेलं नाव आहे. सईने नेहमी वेगळी भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेमातला बोल्डनेस असो किंवा एखाद्या सिनेमासाठी फिटनेसच्या दृष्टीने केलेला बदल असो, ती चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस आली आहे
सईच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती या वर्षाच्या सुरुवातीला 'भक्षक' हा हिंदी सिनेमा, तसंच 'श्रीदेवी प्रसन्न' या मराठी सिनेमात दिसली होती. आगामी काळात ती 'अग्नी', 'ग्राउंड झिरो' या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसेल. यामध्ये ती अभिनेता विजय वर्मासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत सई आता 'बिझनेस वुमन'ही झाली आहे.