Close

अंजायना जागरूकता सप्ताहाची सुरुवात : कृती आराखड्यामधून या विकाराची सखोल माहिती (Angina Awareness Week Initiated : ‘Need Of The Hour’ Action Plan Unveiled)

अंजायना या हृदयाशी संबंधित विकाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अंजायना जागरूकता सप्ताहाची’ नुकतेच सुरुवात झाली. हा सप्ताह २५ जून पर्यंत चालणार आहे. दि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाने अबॉट या हेल्थकेअर कंपनीच्या सहयोगाने हा उपक्रम आखला आहे.

अंजायनाचे लवकरात लवकर निदान होण्याचे व त्याच्या इष्टतम व्यवस्थापनाचे महत्त्व त्यातून सांगितले जाईल. याप्रसंगी अबॉटने तयार केलेल्या ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना’ या कृती आराखड्याचे अनावरण करण्यात आले.

छातीमध्ये अस्वस्थता, वेदना, जडपणा जाणवणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटणे; ही या कोरोनारी आर्टरी आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. लठ्ठपणा हाही अंजायनाचा धोका वाढविणारा महत्त्वाचा घटक आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा धोका अधिक जाणवतो. अंजायनाची समस्या ओळखली जाणे व आजार बळावण्याची प्रक्रिया धीमी करण्यासाठी, लक्षणे दूर करण्यासाठी आणि त्यापायी होणारा औषधांचा जादा खर्च टाळण्यासाठी अबॉटने तीन आगळीवेगळी साधने विकसित केली आहेत.

या कृती आराखड्याची माहिती देण्यासाठी परिसंवाद झाला. अबॉट इंडियाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. अश्विनी पवार यांनी या आजारावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. त्यात एपीआयचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद नाडकर तसेच ज्येष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. व्ही. टी. शाह आणि एपीआयचे जनरल सेक्रेटरी डॉ. आगम व्होरा यांचा समावेश होता.

Share this article