साहित्य: 20 ग्रॅम उकडलेले बटाटे, 20 ग्रॅम पनीर, 20 ग्रॅम गाजर, 20 ग्रॅम फरसबी, 20 ग्रॅम कोबी, 5 ग्रॅम कोथिंबीर, 5 ग्रॅम पुदिना, 10 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम गरम मसाला, 10-12 काजूचे तुकडे, ब्रेड क्रम्स, चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि काळी मिरी पावडर. कृती: सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. पनीर आणि बटाटे मॅश करा. त्यात भाज्या, ब्रेड क्रम्स, काजूचे तुकडे, कोथिंबीर, पुदिना, काळे मीठ, मीठ, जिरेपूड, गरम मसाला आणि काळी मिरी घालून चांगले मिक्स करा. लांब कबाब बनवा आणि 30 मिनिटे ग्रिलमध्ये ठेवा. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
Link Copied