हल्ली बहुतांश लोकांना वजन वाढीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. वजन वाढणं म्हणजे अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण असं डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञही सांगतात. मग वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय सांगितले जातात. मात्र वजन नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय सोपा अन् प्रभावी असा घरीच उपलब्ध असणारा उपाय म्हणजे बडीशेप. मुखवास म्हणून खाल्ली जाणारी बडीशेप वजन कसे काय नियंत्रणात आणते ते पाहुया.
- बडीशेपमध्ये जी पोषक तत्वं असतात ती शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकतात. त्यामुळे तिचे सेवन केल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि वजनही कमी होते.
- बडीशेपमध्ये फायबरचा भरपूर स्रोत आहे. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. भूक लागत नाही. त्यामुळे उगीचच जास्त खाणे होत नाही. कमी कॅलरीज घेतल्याने अनायसे वजन कमी होण्यास मदत होते.
- बडीशेपचे सेवन केल्याने शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण मजबूत होते, ज्यामुळे शरीरात चरबी कमी होते.
- बडीशेप खाल्ल्याने दात स्वच्छ होतात, तसेच पचनक्रियाही चांगली होते. बडीशेपमध्ये उपस्थित आहारातील फायबर पचन सुधारते, जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
- बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी एक उत्तम औषध आहे. बडीशेपचे पाणी सतत सेवन केल्याने वजन सहज नियंत्रित करता येते. बडीशेप पाणी कसे तयार करावे.
एका भांड्यात दोन ग्लास पाणी टाका आणि त्यात एक चमचा बडीशेप आणि थोडी चिमूटभर हळद घालून नीट मिक्स करा. हे पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते उकळून त्या पाण्याचे सेवन करा. दिवसातून दोनदा याचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होते.
Link Copied