सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा कल अनेक निर्मात्यांचा पाहायला मिळतो. मात्र ओटीटीवर जाणाऱ्या कंटेंट वर अद्याप सरकारी पातळीवरून योग्य अशी नियमावली नाहीत. यामुळे अनेक आक्षेपार्ह चित्रपट या ओटीपी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातात आणि त्याचे दुष्परिणाम देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. खरंतर भारत ही साधू संतांची भूमी आणि याच भूमीतून अनेक संतांनी धर्म ज्ञान कला संस्कृती याचा प्रसार केला आणि समाजाला योग्य दिशा दाखवली. असे असताना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान तसेच 'यशराज फिल्म्स' यांचा 'महाराज' हा चित्रपट उद्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे मात्र या आधीच हिंदुत्ववादी संघटना कडून या चित्रपटाला विरोध होत आहे. या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केला आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उद्या महाराज हा साधू संतांवरील चित्रपट रिलीज होत मात्र या चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांकडूनच विरोध केला जात असून या चित्रपटामध्ये १५० वर्षापूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असून यापूर्वी देखील आमिर खान यांच्या पिके चित्रपटातून देखील असाच साधू ची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता आमिर खानच्या मुलाकडून देखील असंच बदनामीचा षडयंत्र केला जात आहे. यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे जबाबदार असतील. असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे.
तसेच जुनैद खान, अमिर खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे मदरश्यांमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का? लहान मुलांची माथी भडकवून त्यांना जिहादी कृत्यांसाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्याकडून आतंकवादी आणि देशविघातक कृत्ये कशी करवून घेतली जातात. या विषयावर चित्रपट बनवतील का? चर्च वा चर्चप्रणीत वसतिगृहामध्ये ख्रिस्ती धर्मगुरुंकडून होणारे मुले आणि महिलांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का? असा सवाल आंदोलकांनी यावेळी विचारला आहे तसेच अशा विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस बॉलीवूड करणार नाही. मात्र हिंदू संतांना, हिंदू धार्मिक कृत्यांना सहजतेने लक्ष्य केले जात आहे.हिंदू सहिष्णु असल्याने आणि 'सेक्युलरिझम' च्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवले जाते. हे कदापि सहन केले जाणार नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी. तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी 'ईशनिंदा विरोधी कायदा' देशभरात लागू करावा अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे. या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती सह हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.