Close

फादर्स डे निमित्त संकर्षण कऱ्हाडेने सांगितल्या वडील व मुलांच्या आठवणी ( Sankarshan Karhade Share His Son And Father Memories)

संकर्षण लवकरच झी मराठीवर परीक्षक म्हणून दिसणार आहे. जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसेल. आपल्या खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्यांनी फादर्स डे दिवशी आपला बाबा म्हणून अनुभव व्यक्त केला.

मी माझ्या बाबांकडून काय शिकलो आणि त्यांचे कोणते गन घेतले ते ही सांगितले, " मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. २७ जूनला त्यांना ३ वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून खूप सय्यम शिकलो आहे आणि माझी नवीन मालिका ‘ड्रामा ज्युनिअर्स’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत ह्या सय्यमचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय साय्यमाचं काम आहे, ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील ह्याचा काहीच नेम नसतो. अश्यावेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्याविचारात असाल त्याच्यावर तुम्हाला रागवून रिऍक्ट करण्याची परवानगीच नाही.

त्यांना कळत नाही की ते आता काय करतायत त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर साय्यमाचं काम आहे. एक बाबा म्हणून माझा सय्यम प्रचंड वाढला आहे. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो. मला माझी लहान बाळं एक क्षण ही रडलेले आवडत नाही. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगोत की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबत त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळत.

माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलंय ते काम नियमाने नित्याने सचोटनी करणारा माणूस. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो आणि त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणायचा प्रयत्न करतो. बाबानी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं हे काटाक्षने पाळलं आणि एक छान आयुष्य दिलं आणि त्याचंच मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे. "

Share this article