साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले आणि चिरलेले बटाटे, 1 जुडी पुदिना, 3 टोमॅटो, 2 कांदे, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या,1 इंच आले,2 चमचे धणे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आमचूर, अर्धा टीस्पून हळद, 2 तमालपत्र, 2ते 3 लवंगा आणि वेलची,5 काळी मिरी, थोडी दालचिनी,2 चमचे तेल ,मीठ चवीनुसार.
कृती : पुदिना, टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि आले - हे सर्व एकत्र बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि सगळे गरम मसाला घाला. तयार केलेली पेस्ट घाला. दहा मिनिटे परतून घ्या. चिरलेला बटाटा घाला. आणि सर्व मसाले घालून मिक्स करावे. थोडा वेळ शिजवून कोथिंबिरीने सजवा.
Link Copied