शरद केळकर आणि महेश मांजरेकर यांच्यानंतर आता शाहिद कपूरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता लवकरच 'OMG 2' फेम दिग्दर्शक अमित रायच्या पुढील चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे ऐकू येत आहे.
या चित्रपटासाठी शाहीदशिवाय निर्मात्यांनी राणा दग्गुबतीशीही संपर्क साधला आहे. यात तो औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हा चित्रपट फ्लोरवर जाऊ शकतो. साऊथचा प्रसिद्ध निर्माता दिल राजू या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
शाहिदने यापूर्वी 'पद्मावत' चित्रपटात राजा रतन सिंह यांची भूमिका साकारली होती. त्याच्या कारकिर्दीतील हा एकमेव पीरियड ड्रामा चित्रपट आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, चित्रपटातील औरंगजेबच्या भूमिकेसाठी राणा दिग्दर्शक अमितची पहिली पसंती आहे. मात्र, यावर अंतिम चर्चा होणे बाकी आहे. शाहिदही या व्यक्तिरेखेसाठी खूप उत्सुक आहे.
राणाने यापूर्वी 'बाहुबली' या पिरियड ड्रामामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. सध्या, निर्माते चित्रपटाची स्क्रिप्ट तसेच त्याच्या प्री-प्रॉडक्शनला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. डिसेंबरपर्यंत त्याचे शूटिंग सुरू होऊ शकते.
या व्यक्तिरेखेसाठी शाहिदने तयारी सुरू केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. आयुष्यभराची संधी म्हणून तो या भूमिकेकडे पाहत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी अक्षय कुमार स्टारर 'OMG 2' चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट छत्रपती शिवरायांच्या जीवनाभोवती विणलेला आहे. मात्र, हा त्यांचा बायोपिक असणार नाही.