Close

मुनव्वर फारुकीची नवीन पत्नी, मुलगा आणि सावत्र मुलीसोबत पिझ्झा डेट, फोटो व्हायरल ( Munawar Faruqui Goes To Pizza Date With New Begam, Step Daughter And His Son)

'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टँड-अप कॉमेडियन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने गुपचूप दुसरे लग्न केले. आता तो त्याची दुसरी पत्नी मेहजबीन कोतवाला आणि सावत्र मुलीसोबत पिझ्झा डेटला गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मुलगा मिकेलही होता. मिकेल हा त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मुनव्वर आणि मेहजबीनही एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत.

मुनावर फारुकी 32 वर्षांचा आहे. जेव्हा तो कंगना रणौतच्या रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन १' मध्ये होता तेव्हा चाहत्यांना पहिल्यांदाच त्याची पत्नी आणि मुलाबद्दल माहिती मिळाली होती. पुढे याच शोमध्ये मुनव्वरने लहान वयातच लग्न झाल्याचा खुलासा केला. त्याचा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्याने सांगितले. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव मिकेल आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मुनावर फारुकी आणि त्यांची नवी पत्नी मेहजबीन कोतवाला दिसत नसले तरी त्यांचा हात नक्कीच दिसत आहे. समोर मुलगा मिकेल आहे आणि त्याच्या शेजारी सावत्र मुलगी आहे. दोघांचेही चेहरे दाखवलेले नाहीत. इमोजीसह लपवले आहे. टेबलाच्या मध्यभागी पिझ्झा आहे.


अलीकडेच अचानक बातमी आली की मुनव्वरने दुसरे लग्न केले आहे. 'बिग बॉस 17'मध्ये नझिला आणि आयशा खानच्या नावांची चर्चा सुरू झाल्यानंतर, जेव्हा निकाहची बातमी आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार मेहजबीन कोतवाला एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिला 10 वर्षांची मुलगी आहे. या दोघांचे हे दुसरे लग्न आहे.

Share this article