द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' या लोकप्रिय कार्यक्रमात टेनिसपटू सानिया मिर्झा सहभागी झाली होती. सानिया मिर्झासह बॉक्सर मेरी कॉम, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि शार्पशूटर सिफ्त कौर ही मंडळी सहभागी झाली होती. दरम्यान सानिया मिर्झाने आपल्या बायोपिकबद्दल भाष्य केलं. कपिल शर्माने सानिया मिर्झाला तिच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला की,"मेरी कॉम'च्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्राने काम केलं आहे. परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या भूमिकेला न्याय दिला होता. तर तुझ्या बायोपिकमध्ये तुला कोणाला पाहायला आवडेल?".
कपिल शर्माच्या प्रश्नाचं मजेशीर अंदाजात उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की, आपल्या देशात अनेक चांगले कलाकार आहेत. कोणीही काम केलं तरी चालेल. किंवा मी स्वत:देखील अभिनय करू शकते".
कपिल शर्मा पुढे म्हणाला की, शाहरुख खान एकदा म्हणाला होता की सानिया मिर्झावर बायोपिक आला तर तिच्या लव्हस्टोरीवर काम करायला मला आवडेल. कपिलच्या या कमेंटनंतर सानिया मिर्झा शांत होते आणि म्हणते,"मला लव्हस्टोरीचा शोध घ्यावा लागेल".
कपिल शर्माने पुढे सानियाला विचारलं की,"तुझ्या बायोपिकमध्ये शाहरुख काम करत असेल तर त्याच्या अपोझिट अभिनय करायला तुला आवडेल का?". या प्रश्नाचं उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की," शाहरुख खान जर चित्रपटात काम करत असेल तर मला त्याच्यासोबत अभिनय करायला आवडेल. जर अक्षय कुमार चित्रपटात झळकणार असेल तर नक्की काम करेल". सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी शोएबपाहून ती विभक्त झाली असल्याचे जाहीर केले आहे. सानिया मिर्झा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.