Close

होणाऱ्या बाळासाठी दीपिका पादुकोणने सुरु केली शॉपिंग (Deepika Padukone starts shopping for her baby) 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. बॉलीवूडच्या या सर्वात लाडक्या जोडप्याने मार्चमध्ये गर्भधारणेची घोषणा करत ते सप्टेंबरमध्ये बाळाचे स्वागत करणार असल्याचे सांगितले होते. जेव्हापासून तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून तिचे चाहते तिच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, दीपिका देखील सुंदरपणे तिच्या गर्भधारणेची चमक दाखवत आहे. जसजसा तिचा बेबी बंप वाढत आहे, तसतसे तिचे सौंदर्य देखील खुलतआहे. आजकाल, दीपिका कौटुंबिक आऊटिंग आणि इव्हेंटमध्ये वारंवार हजेरी लावत आहे आणि गर्भधारणेची फॅशन सेट करत आहे. आई होणार असल्याचा आनंद प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

दरम्यान, आता दीपिका पदुकोणचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका दुकानात एकटीच शॉपिंग करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, दीपिकाने आतापासूनच तिच्या होणाऱ्या बाळाची खरेदी सुरू केली आहे.

मुंबईतील लुई व्हिटॉन स्टोअरमधील दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने राखाडी रंगाचा लाँग कोट घातला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री एकटीच शॉपिंग करताना दिसत आहे.

दीपिका सध्या ६ महिन्यांची गर्भवती आहे. सप्टेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीर केवळ आई-वडील होण्यासाठी उत्सुक नाहीत, तर चाहतेही त्यांना पालक बनताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Share this article