नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. विशेषत: नताशाच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून त्यांचे नाते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे सतत संकेत देत होते. या जोडप्याने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्यांचे चाहते त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने नाराज झाले होते आणि त्यांच्यामध्ये सर्वकाही सामान्य व्हावे अशी प्रार्थना करत होते.
चाहत्यांच्या प्रार्थना कामी आल्यासारखे दिसते. कारण आत्तापर्यंत गूढ पोस्ट शेअर करणाऱ्या नताशा स्टॅनकोविकने स्वतः सोशल मीडियावरील मतभेद संपवण्याचे संकेत दिले आहेत आणि या जोडप्यामधील प्रेमळ क्षण सोशल मीडियावर दिसू लागले आहेत. नताशाने काय केले ते जाणून घेऊया.
काही दिवसांपूर्वी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या पतीचे आडनाव अचानक काढून टाकले. सोशल मीडियावर ती सतत गूढ पोस्ट शेअर करत होती. तिने हार्दिक पांड्यासोबतचे सर्व फोटो डिलीटही केले होते, त्यानंतर लोकांनी ते विभक्त झाल्याची बातमी खरी मानली. ते घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांच्या आयुष्यात आणखी कोणीतरी शिरल्याचेही बोलले जात होते.
मात्र आता नताशाने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. नताशाने आता हार्दिकसोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवर रिस्टोअर केले आहेत . या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नाच्या फोटोंचाही समावेश आहे, जे फाटाफुटीच्या बातम्यांदरम्यान नताशाने हटवले होते.
नताशाच्या या सरप्राईजमुळे चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. या दोघांचे पुन्हा फोटो पाहून त्यांना हायसे वाटले असून, फोटोंसोबतच त्यांचा आनंदही दुणावला आहे. मात्र, हे फोटो गायब का झाले आणि ते पुन्हा का आणण्यात आले, याबाबत चाहत्यांमध्येही संभ्रम आहे.