लवकरच बिग बॉस ओटीटी ३ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या जूनपासून प्रेक्षकांना बिग बॉस ओटीटी ३ पाहायला मिळणार आहे. नुकताच जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस ओटीटीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
नुकताच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना होस्ट म्हणून सलमान खान नाही तर अनिल कपूर दिसणार आहे. प्रोमो जरीही शेअर केला असला तरीही अद्याप निर्मात्यांकडून त्याची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते बिग बॉस ओटीपी ३ च्या प्रोमोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो प्रमुख क्षण आलेला आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे त्यामुळे तो बिग बॉस ओटीपी मध्ये होस्टिंग करणार नाही.
जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम पेजवर निर्मात्यांनी प्रोमो शेअर केलेला आहे. या प्रोमोमध्ये त्यांनी म्हटलं की, बिग बॉस ओटीटीच्या नवीन सीझनसाठी एक नवीन होस्ट आणि बिग बॉस प्रमाणे त्याचा आवाजच पुरेसा आहे बिग बॉस ओटीपी जूनमध्ये जिओ सिनेमा प्रीमियमवर येत आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस ओटीटीची रिलीज डेट जाहीर केलेली नाही पण प्रोमोमध्ये निर्मात्यांनी जून २०२४मध्ये कोणत्याही तारखेपासून हा शो टेलिकास्ट होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. बिग बॉस ओटीटीसाठी करण जोहर किंवा सलमान खानच्या ऐवजी अनिल कपूर शो होस्ट करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस ओटीटीमध्ये आशिष शर्मा, प्रतीक्षा होनमुखे, शहजादा धामी, विकी जैन, शीझान खान आणि अरहान बहल यांसारखे सेलिब्रेटी स्पर्धक म्हणून दिसण्याची शक्यता आहे.