Close

बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊन निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात कशी कराल? (How To Treat Gut Disorders Created By Consuming Hotel And Junk Food?)

कामानिमित्त बाहेर जाणे असो, विकेंड असो वा पार्टी असो सतत बाहेर फिरणे होत असतेच; त्यात आता सुट्ट्यांची भर, त्यामुळे अर्थात बाहेरचे खाणे स्वाभाविकच आले. परंतु सतत बाहेरील खाणे तेही जंकफूड खात असाल तर आपल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. जसे की आता उन्हाळा आहे तर शीतपेय पिणे, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा खाणे हे ओघाने आलेच. यामुळे मोठ्यांचे पॉट बिघडतेच त्याचसोबत लहानांना मात्र मोठ्या प्रमाणात लवकर संसर्ग होऊन पोटदुखी, जुलाब किंवा जळजळ सुरु होते. त्यामुळे बाहेर जात असाल तर सतत बाहेरील खाण्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जाणून घेतले पाहिजे. या दुष्परिणामांबाबत प्रश्नोत्तरांच्या रुपाने माहिती देत आहेत पिंपरी, पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट, डॉ. अमोल डहाळे.  

आतड्यांसंबंधी आरोग्याच्या बाबतीत सध्याची स्थिती काय आहे?

सध्याच्या स्थितीला आतड्यांसंबंधी समस्या असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कारण बहुतांशी लोक घराबाहेरील अन्न अधिक प्रमाणात खाताना दिसून येतात. हे शरीरासाठी अत्यंत अपायकारक आणि काही प्रकरणांमध्ये घातक सुद्धा ठरत आहे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य वेगाने धोक्यात येत असल्याचे दिसून येतेय. त्याचसोबत मद्यपान आणि धुम्रपान यामुळेही अशाच समस्या निर्माण होत आहेत.

गेल्या १५ दिवसांत आतड्यांसंबंधी आरोग्याची किती प्रकरणे समोर आली आहेत?

मागील काही दिवसांमध्ये आतड्यांसंबंधीच्या आरोग्याशी संबंधित जवळजवळ २० रुग्ण पाहिले आहेत आणि यापैकी बहुतेक रुग्णांना ब्लोटिंग/डायरिया, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी अशा वेगवेगळ्या तक्रारी असल्याचे समोर आले.

आतड्यांसंबंधीच्या आरोग्य समस्यांमध्ये योगदान देणारी विशिष्ट कारणे कोणती आहेत?

सर्वात स्पष्ट कारण म्हणजे जीवनशैलीतील बदल; ज्यात धूम्रपान, दारू पिणे, झोपेच्या वेळेत बदल, योग्य अन्न न खाणे आणि सतत बाहेरील अन्न खाणे यांचा समावेश आहे.

जीआय आरोग्य समस्यांसाठी शिफारस केलेले उपचार कोणते आहेत?

तज्ज्ञांनी शिफारस केलेले उपचार आणि त्यामध्ये अँटिबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स सारखी वेगवेगळी औषधे. यामध्ये लक्षणांवर आधारित उपचार केले जातात त्यामुळे जर एखाद्याला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर आम्ही रुग्णाला टीपीआय देतो जो ॲन्टी ॲसिडिटी आहे. ब्लोटिंगसाठी विशिष्ट प्रकारची औषधे आहेत. कधीकधी आम्ही एंजाइम तयार करण्याचा सल्ला देतो किंवा त्यांचा आहार बदलण्याची शिफारस करतो.

आतड्यांचे आरोग्य बिघडल्यावर कोणती काही लक्षणे दिसू शकतात?

कधीकधी रुग्णांना त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ जाणवू शकते. काही रुग्णांना मळमळ होऊ शकते. काही रुग्णांना सतत पोट फुगल्यासारखे वाटते. जास्त वायू जमा होणे - ढेकर येणे किंवा पोट फुगणे.

आतड्याचे/पोटाचे चांगले आरोग्य किती प्रमाणात महत्त्वाचे आहे आणि काही चांगल्या आतड्यांसंबंधी आरोग्य पद्धती कोणत्या आहेत?

चांगले आतडे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला नेहमीच्या संसर्गापासून नेहमीच प्रतिबंधित करते. तुमच्या आतड्यांचे आरोग्य खराब असल्यास तुम्हाला दूषित अन्न किंवा पाण्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही वेळेवर खाणे आवश्यक आहे आणि तुमच्या आहारात भरपूर प्रोबायोटिक्स असणे आवश्यक आहे. जेवणात शक्यतो सॉस टाळावे कारण ते योग्यरित्या शिजवलेले नसते. लठ्ठपणा, धूम्रपान आणि अल्कोहोल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्या आतड्यांच्या आरोग्यामध्ये बदल घडवून आणते. या सवयी सोडणे केव्हाही चांगले.

(फोटो सौजन्य – फ्री पिक)

Share this article