स्त्री या हॉरर कॉमेडी चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या दिनेश विजान यांचा मुंज्या हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
मुंज्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक जंगल दिसते. या जंगलामध्ये एक शापित ठिकाण, या ठिकाणी एक झाड असते जिथे मुंज्याचा आत्मा असतो. ट्रेलरमध्ये दिसत आहे की मुंज्याचे लग्न मुन्नीशी होणार असते, पण त्या आधीच त्याचा मृत्यू होतो. त्या दिवसापासून मुंज्या भूत होऊन मुन्नीची वाट बघत असतो.
शर्वरी वाघनं मुंज्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिने “मुन्नी के लिये मुंज्या जान दे भी सकता है और ले भी सकता है... आ गया है मुंज्या”, अशी कॅप्शन दिली आहे.
मुंज्या या चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंग, सुहास जोशी आणि सत्यराज सिंग या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मुंज्या ७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.