पुण्यातील कल्याणी नगर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श कारने २ जणांचा बळी घेतला. या प्रकरणी त्या आरोपी मुलाला अटक केल्यानंतर १५ तासांनंतर त्याची सुटका करण्यात आली. मात्र, आता त्याची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आल्याने मुनव्वरने आपल्या खास शैलीत याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पैशाच्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्यांवर त्याने निशाणा साधला आहे.
मुनव्वरने या दुर्घटनेबाबत लिहिले की, जर तो पोर्श खरेदी करू शकत असेल तर त्याने इतर गोष्टीही विकत घेतल्या असतील. यानंतर मुनव्वरने आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये लिहिलेले की, जेव्हा मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे नोकिया ११०० होता त्याला मी २ रबर बँड लावले होते.
Woh porsche kharid sakta hai,
— munawar faruqui (@munawar0018) May 23, 2024
Toh baaki chize bhi
kharid hi liya hog na.
मुनव्वरच्या या दोन पोस्टवर युजर्सकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत प्रत्येकजण त्याच्या मताला पाठिंबा देत आहे. आरोपीला त्याची शिक्षा झालीच पाहिजे असे सर्वांचे म्हणणे आहे. पैशाच्या नावाखाली दोन जीव गेले जे माणूसकीला काळीमा फासणारे आहे असे एकाने म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिले की ज्या कुटुंबांनी आपली माणसं गमावली त्यांना विचारा, पैसे त्यांच्या वेदना विकत घेऊ शकतात का?
याप्रकरणी आत्तापर्यंत आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. आपल्या मुलाकडे लायसन्स नाही आणि ड्रायव्हिंगमध्ये त्याला नीट येत नाही हे माहीत असूनही आपल्या मुलाला गाडी चालवू दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.