बिग बॉस फेम राजीव अदातियाने आपल्या सोशल मीडियावर रविवारी पुणे कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावर संताप व्यक्त केला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
त्याने लिहिले की, एक श्रीमंत व्यक्ती ज्याने त्याच्या पोर्श कारने दोन लोकांना ठार केले आणि त्याला ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्याऐवजी "रस्ता सुरक्षेवर एक निबंध लिहा!" मोदी आणि राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांच्याशी लढण्यापेक्षा आपली न्याय व्यवस्था सुधारण्याची गरज आहे!!...
अभिनेत्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, माझे भारतावर प्रेम आहे! भारत माझं दुसरं घर आहे, पण इथल्या न्यायव्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी! हे असे चालणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र बसून न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे, कठोर नियम आणि कायदे विकत घेतले जाऊ शकत नाहीत! पण श्रीमंत लोक या गोष्टी सहज करतात याचे मला आश्चर्य वाटते. पैशांच्या जोरावर न्याय देऊ नये. देश फक्त श्रीमंतांसाठी नाही!! देशातले प्रत्येक माणसाचे जीवन महत्वाचे आहे!
जेव्हा सत्ता आणि पैसा सर्वकाही नियंत्रित करतात तेव्हा मध्यमवर्गीय कष्टकरी लोकांना कोणत्या संधी असतात! या मुलाला तासाभरात जामीन मिळाला हे पाहून वाईट वाटले. कारण त्याजागी कोणी सर्वसामान्य माणून असता तर त्या सामान्य माणसाला कधीच सोडले नसते! खूप वाईट आहे हे !!