बॉलिवूडच्या प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला तिसरे वर्ष पूर्ण होत असून चाहते या जोडप्याकडून गोड बातमी मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, कतरिना कैफ प्रेग्नंट असून लवकरच बाळाला जन्म देणार असल्याची बातमी समोर येत आहे. हे आम्ही म्हणत नसून, विकी कौशलसोबत लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा एक व्हायरल व्हिडिओ हे सांगत आहे, ज्यामध्ये तिचा हेवी बेबी बंप दिसत आहे.
कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे आणि कोणत्याही कार्यक्रमात किंवा फंक्शनमध्ये येणं टाळते. अशा परिस्थितीत चाहत्यांनी आधीच ती प्रेग्नंट असल्याची अटकळ बांधली होती, त्यामुळेच ती लाइमलाइटपासून दूर आहे. नंतर कळले की कतरिना लंडनमध्ये आहे आणि तिकडे थंडी सुरु आहे. आता विक्की कौशल देखील लंडनला पोहोचला आहे, तेथून रस्त्यावर हातात हात घालून फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये, कतरिनाने मोठ्या मापाचे कपडे घातले आहेत. त्यात तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय विकी पत्नी कतरिनाची जास्त काळजी घेताना दिसत आहे, ज्याला पाहून लोक अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचे सांगत आहेत आणि मोठ्या कपड्यांमध्ये बेबी बंप लपवताना दिसत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की दीपिका पदुकोणच्या आधी कतरिना गुड न्यूज देईल, कारण तिचा बेबी बंप दीपिकाच्या बंपपेक्षा मोठा दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी विक्की कौशलच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतः कतरिनाने तिसरे अपत्य येण्याचे संकेत दिले होते. नुकताच विकी कौशलने त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. विकीच्या वाढदिवशी कतरिनाने तिच्या पतीचे अनेक फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिने तीन केक आणि तीन हार्ट इमोजी टाकले. त्यानंतरही चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की तिसरा इमोजी एका नवीन पाहुण्यासाठी होता जो लवकरच त्यांच्या आयुष्यात येणार आहे.
कतरिना आणि विकी लंडनमध्येच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व नियोजनही केले आहे. विकी देखील शूटमधून मोकळा होताच लंडनला पोहोचतो, जेणेकरून तो त्याच्या लेडी लव्हसोबत वेळ घालवू शकेल.