मुंबईकर भावांनो आणि बहिणींनो... महाविकास आघाडीला दिलेलं तुमचं एक मत मोठ्ठी क्रांती करू शकतं. मशाल-तुतारी किंवा हाताचा पंजा समोरचं बटन दाबून दिलेलं तुमचं एक मत, देश नासवणार्या 'नाठाळांच्या माथी काठी' हाणू शकतं...
लैंगीक शोषणाविरोधात दाद मागणार्या आपल्या सात कुस्तीगीर भगिनींना न्याय नाहीच मिळाला. तुमचं एक मत सत्ताधार्यांच्या वळचणीला बसलेल्या त्या लिंगपिसाट विषारी नराधमाचं मुंडकं ठेचू शकतं !
मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढल्या गेलेल्या भगिनींना न्याय सोडा... त्यांची विचारपूसही केली गेली नाही. तुमचं एक मत त्यांच्यासाठी कृष्णाने द्रौपदीची राखलेली लाज ठरू शकतं !
दिल्लीच्या वेशीवर आंदोलनात शहीद झालेल्या आपल्या पोशिंद्या बळीराजांच्या कुटूंबीयांवर आभाळ कोसळलंय... खाल्ल्या अन्नाला जागून दिलेलं तुमचं एक मत त्यांच्या दु:खावर हलकीशी का होईना पण फुंकर मारू शकतं !
तुमचं एक मत लॉकडाऊन मध्ये हजारो किलोमीटर पायी चालत आपल्या गावी गेलेल्या मजुरांना... नोटबंदीच्या वेळी भर उन्हात एटीएम बाहेर रांगेत उभे राहून मृत्यूमुखी पडलेल्या वयोवृद्ध मातापित्यांना... लडाखमधल्या लाखो नागरिकांना... रक्ताचं पाणी करून कापूस, सोयाबीन, तूर, कांदा पिकवणार्या शेतकऱ्यांना...बेरोजगार पदवीधर तरूणतरूणींना...
आणि पुलवामामध्ये शहीद झालेल्या त्या चाळीस जवानांना...
'न्याय' देऊ शकतं. बाकी आपल्याला रोज अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करत ट्रोल करणार्या भक्ताड पिलावळीला सरळ करायला लै वेळ लागणार नाय. ते काम असंही आणि तसंही करायचंच आहे. आपल्या 'हातात' आहे ते. तुर्तास बोटाचं काम करूया.
जय शिवराय... जय भीम... जय महाराष्ट्र !
- किरण माने.
लोकसभा निवडणूकीबाबत किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Post On Loksabha Election 2024)
Link Copied