Close

अक्षय कुमारने केले मतदान, भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावला हक्क ( Akshay Kumar casts first vote after getting Indian citizenship )

अभिनेता अक्षय कुमारने आता नुकतेच मतदान करून देशाच्या नागरिकत्वाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमारला गेल्यावर्षीच भारतीय असल्याचे नागरिकत्व मिळाले होते. यापूर्वी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने त्याला भारतात मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. पण आता त्याला भारताचे नागरिकत्व असल्याचा दाखला मिळाल्यामुळे त्याने सकाळीच मतदान करून आपला हक्क बजावला आहे.

तसेच त्याने मतदान झाल्यावर मीडियाला मुलाखतही दिली. त्यात तो म्हणाला की, माझा भारत विकसित राहो, मजबूत राहो एवढेच मला वाटतं... त्याला अनुसरूनच मी मतदान केलं आहे.

मुंबईकर मतदानाला जास्त प्रतिसाद देत नाहीत असा प्रश्न विचारला असता अक्षय म्हणाला की, असं काही नाही... आता मी सकाळी ७ वाजता जाऊन आलो तरीही आत मध्ये ५०० -६०० लोक लाईन मध्ये होते. त्यामुळे जे काय होईल ते चांगलंच होईल.... तसंच पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळाल्यावर फारच छान वाटत असल्याची प्रतिक्रिया आहे त्याने दिली.

Share this article