Close

भारतातील ५गडगंज श्रीमंत दिग्दर्शक, कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती? (Top 5 Rich Directors In India)

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण सेलिब्रिटी त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. महागडे कपडे, महागड्या गाड्या आणि अलिशान घरांमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. झगमगत्या विश्वातील श्रीमंतांच्या यादीत अभिनेता शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत किंग खानचा समावेश आहे. 2023 च्या एका रिपोर्टमध्ये, शाहरुख खान जगातील चौथा श्रीमंत अभिनेता असल्याचं समोर आलं.

शाहरुख खान याच्यासोबत श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार देखील आहे. कतरिना कैफ, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, सोनम कपूर देखील प्रचंड श्रीमंत आहे. पण आता भारतातील पाच श्रीमंत दिग्दर्शकांबद्दल जाणून घेऊ...

दिग्दर्शक करण जोहर : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याने आतापर्यंत अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या सिनेमांना प्रेक्षकांकडून देखील भरभरुन प्रेम मिळालं. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ यांसारख्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन अभिनेत्याने केलं आहे.

करण जोहर बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. करण जोहर याच्याकडे आज जवळपास 1 हजार 700 कोटी रुपयांचा संपत्ती आहे. शिवाय करण कुटुंबासोबत आलिशान घरात राहातो.

दिग्दर्शक राजकुमार हिराणी : हिराणी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत फक्त 6 सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्यांचा प्रत्येक सिनेमा यशस्वी ठरला आहे. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे 1 हजार 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी :  ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, संजय लिला भन्साळी यांच्याकडे रिपोर्टनुसार 940 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप : सर्वात श्रीमंत भारतीय दिग्दर्शकांच्या यादीत दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं देखील नाव आहे. अनुराग कश्यप याच्याकडे रिपोर्टनुसार 850 कोटी रुपये आहेत.

दिग्दर्शक मेघना गुलजार : ‘सॅम बहादुर’, ‘राजी’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या मेघना गुलजार देखील श्रीमंत भारतीय दिग्दर्शकांच्या यादीत सामील आहेत. मेघना गुलजार यांच्याकडे रिपोर्टनुसार 830 कोटी रुपये आहेत.

Share this article