Close

कर्णबधिरांच्या मदतीसाठी सोनू सूदचा नवा उपक्रम, व्हिडिओ शेअक करत दिली माहिती ( Sonu Sood new initiative to help deaf people, informed by sharing video )

पडद्यावर खलनायक आणि खऱ्या आयुष्यात नायक अशी अनोखी ओळख सोनू सूदला मिळाली आहे. करोनाच्या काळात त्याने ज्या प्रकारे बेरोजगार आणि असहाय लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला त्यासाठी त्याचे जितके कौतुक करु तितके कमीच.

लोकांना मदत करण्यासाठी सोनू अनेकदा वेगेवगळ्या मार्गाचा अवलंब धरतो. दरम्यान, सोनू सूदने एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ज्यांना ऐकू येत नाही अशांची मदत करणार असल्याचे म्हटले आहे.

जे पाहू, बोलू आणि ऐकू शकत नाहीत त्याच्या आयुष्यात बऱ्याच अडीअडचणी येतात. अशा गंभीर समस्यांनी ग्रासलेल्यांसाठी सोनू सूदने आता नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. शनिवारी सोनूने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये सोनू म्हणतोय की, ज्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी मोठं घेऊन येतोय, ज्याच्या मदतीने यापुढे देशातील कोणालाही या समस्येचा सामना करावा लागणार नाही. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले आहे की, आता सर्वांना ऐकू येईल.

सोनूच्या या व्हिडिओवरून तो कर्णबधिरांसाठी काही खास प्रकारची उपकरणे बवनेल, जेणेकरून त्यांनाही ऐकू येईल. याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

एक अभिनेता म्हणून सोनू सूदने चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आपली छाप सोडली. अभिनेत्याच्या आगामी 'फतेह' या चित्रपटाचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझरही मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता, सोनूचा फतेह यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जाते.

Share this article