साहसी खेळांचा रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी' चे १४वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यावेळी या शोचे शूटिंग युरोपातील रोमानिया शहरात होणार आहे. अन् अर्थातच चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हा सीझन होस्ट करणार आहे.
आता या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्टार्सची नावं देखील समोर आली आहेत. पुष्टी झालेल्या स्पर्धकांच्या यादीमध्ये सध्या १३ नावं निवडली गेली आहेत.या यादीत 'बिग बॉस 17' फेम अभिषेक कुमारपासून ते टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. चला स्पर्धकांची संपूर्ण यादी जाणून घेऊया...
अभिषेक कुमार
'बिग बॉस 17' चा फर्स्ट रनर अप, अभिषेक कुमार 'खतरों के खिलाडी 14' चा पहिला निश्चित केलेला स्पर्धक आहे. रोहित शेट्टी 'BB17' मध्ये गेला होता. त्यांनी तिथे एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात अभिषेक विजयी झाला होता. त्यानंतर रोहित शेट्टीने सर्वात आधी त्यांना त्यांच्या शोसाठी निवडले.
समर्थ जुरेल
'बिग बॉस 17'चा वाईल्ड कार्ड स्पर्धक समर्थ जुरेलदेखील 'KKK 14' चा पक्का स्पर्धक बनला आहे. तसेच समर्थ त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, समर्थने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ईशा मालवीयसोबत ब्रेकअप केले आहे.
अदिती शर्मा
टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मानेही या शोसाठी होकार दिला आहे. अभिनेत्री 'ये जादू है जिन का' आणि 'रब से है दुआ'सारख्या शोमध्ये दिसली आहे.
गश्मीर महाजनी
गश्मीर महाजनी यांनी टीव्हीवर अभिनय आणि नृत्य कौशल्य दाखवले आहे. आता तो 'खतरों के खिलाडी 14' मध्ये आपली हिंमत दाखवायला येणार आहे. अभिनेता शेवटचा 'इमली' शोमध्ये दिसला होता.
करण वीर मेहरा
'बातें कुछ अंकही सी', 'जिद्दी दिल माने ना', 'टीव्ही, बीवी और में' सारख्या शोमध्ये दिसलेला अभिनेता करण वीर मेहरा आता KKK 14 मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. तुम्हाला सांगतो की, करण काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता.
करण आणि टीव्ही अभिनेत्री निधी सेठ यांचे जानेवारी २०२१ मध्ये लग्न झाले होते. पण काही महिन्यांतच त्यांच्या वैवाहिक जीवनात चुरस निर्माण झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
शिल्पा शिंदे
'भाभीजी घर पर हैं' या टीव्ही शोमध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा शिंदे लोकप्रिय झाली. मात्र, २०१६ मध्ये शोमधून तिची जागा रिप्लेस झाली. शिल्पावर अव्यावसायिक असल्याचा आणि निर्मात्यांशी समन्वय नसल्याचा आरोप करण्यात आला होता. 'मॅडम सर' या शोमध्ये ती अखेरची कॅमिओ भूमिकेत दिसली होती.
सुमोना चक्रवर्ती
सुमोना हे टीव्हीच्या दुनियेतील एक मोठे नाव आहे. मात्र, ती काही काळापासून टीव्हीवरून गायब होती. आपल्या कॉमेडीने चाहत्यांना हसवणारी सुमोना आता स्टंट करताना दिसणार आहे. अभिनेत्रीने KKK 14 ची तयारी सुरू केली आहे.
निम्रत कौर अहलुवालिया
या यादीत 'छोटी सरदारनी' फेम निम्रत कौर अहलुवालियाचे नावही जोडले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, निम्रत रिॲलिटी शो 'बिग बॉस 16'चा भागदेखील आहे.
असीम रियाझ
'बिग बॉस 13'चा फर्स्ट रनर अप असीम रियाझ 'खतरों के खिलाडी 14'चा भाग असणार आहे. याला दुजोरा देताना असीम म्हणाला, 'मी शोमधील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि माझ्या मर्यादा तपासण्यासाठी उत्सुक आहे. हा शो स्पर्धकांना धाडसी बनवतो आणि मला खात्री आहे की या शोमधून मला जीवनाबद्दल खूप काही शिकायला मिळेल.
कृष्णा श्रॉफ
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा आता चित्रपट आणि ओटीटीऐवजी थेट टीव्हीवर पदार्पण करणार आहे. अलीकडेच तिने या शोमध्ये आपल्या आगमनाची पुष्टी केली. कृष्णा म्हणाली, 'मला नेहमीच स्वतःला आव्हान द्यायला आवडते. 'खतरों के खिलाडी 14' पेक्षा चांगली संधी कोणती असू शकते जिथे मी माझी मानसिक आणि शारीरिक ताकद वाढवू शकेन.’
आशिष मेहरोत्रा
'अनुपमा' या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या आशिष मेहरोत्राने नुकताच या शोचा निरोप घेतला. येत्या काही दिवसांत हा अभिनेता रोहित शेट्टीच्या शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे.
नियती फतनानी
मालिका 'नजर' फेम अभिनेत्री नियती फतनानीने देखील KKK 14 मध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. गेल्या सीझनसाठीही निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी तिच्या कामाच्या कमिटमेंट्समुळे नियती ऑफर स्वीकारू शकली नाही. यावेळी ती शोमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
शालीन भानोत
या सीझनसाठी अभिनेता शालिन भानोतचेही नाव निश्चित झाले आहे. 'बिग बॉस 16' दरम्यान शालीनला हा शो ऑफर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी ही ऑफर नाकारली होती. 'बिग बॉस' शालीनने 'सूर्यपुत्र कर्ण', 'राम सिया के लव कुश' आणि 'बेकाबू' सारख्या शोमध्येही काम केले आहे.