Close

काय आहे सुर्या दादाची कथा, नितिश चव्हाणच्या भूमिकेची सगळीकडेच चर्चा (Lakhat Ek Amcha Dada Serial Story)

सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुचे इंग्रजी विषयाशी वाकडे आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय, सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घरची काळजी घेणे रखरखाव करणे, हिशेब करणे ती एकप्रकारे घरची फायनान्स मिनिस्टर आहे. राजश्री शिकलेली नाही पण व्यवहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणे शिकायचे आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे.

लहानपणीच आई घर सोडुन पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणीना वाढवलं आहे. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. असं असलं तरी बहिणींचं सूर्यावर प्रचंड प्रेम आहे. सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. तुळजा जिच्यावर सुर्याचं प्रेम आहे. तुळजा मात्र या सगळ्यापासून अजाण असते. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचे स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकले.

एक साधा किराणा दुकानदार असून सुद्धा प्रचंड हिशेबी काय असेल सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट?
या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केलं आहे तर मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी आहेत. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share this article