‘बिग बॉस १६’ मध्ये दिसल्यापासून प्रसिद्धीस आलेला ‘छोटा भाईजान’ अर्थात गायक अब्दू रोजिक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अब्दू रोजिक एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अब्दू रोजिक लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अब्दू रोजिकच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून सोशल मीडियावर सर्वत्र अब्दू रोजिक याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
दोघांचं लग्न ७ जुलै रोजी संयुक्त अरब अमीरात येथे होणार आहे. अब्दू त्याच्या लग्नासाठी खूप उत्सुक असल्याचं त्यानं शेअर केलेले व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.
अब्दू रोजिक याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शेअर करत अब्दू रोजिक याने कॅप्शनमध्ये स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी एवढा भाग्यशाली असेल… याचा मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. मला खास व्यक्तीकडून प्रेम मिळेल, जी माझा सन्मान करते. माझ्या आयुष्यातील अडचणींना त्रास समजत नाही. ७ जुलै सेव्ह द डेट.. मी शब्दात नाही सांगू शकत की मी किती आनंदी आहे…’ असं अब्दू रोजिक म्हणाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दूची होणारी बायको ही बरीच श्रीमंत आहे. अमिरा असं तिचं नाव आहे. दुबईच्या शारजाहमध्ये ती राहतेय. दोघांची पहिली भेट फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एक मॉलमध्ये झाली होती.
अब्दू हा २० वर्षांचा असून त्याची होणारा बायको १९ वर्षांची आहे. सध्या दोघांच्या घरी निकाहची जोरदार तयारी सुरू आहे. अब्दूनं त्याच्या साखरपुड्याची अंगठी देखील त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांची मैत्री घट्ट असली तरी शिव ठाकरेलाही सोशल मीडियावरूनच अब्दूच्या लग्नाबद्दल कळलं असल्याचं त्याने म्हटलं आहे. अब्दूबद्दल सांगायचं झाल्यास, अब्दू ताजिकिस्तानमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. बिग बॉस १६ मध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. मुंबईमध्ये अब्दूचं बर्गइर नावाचं एक हॉटेल आहे.