Close

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ आता मराठीत अल्ट्रा झकास ओटीटीवर! (Hollywood’s Mysterious ‘Ghost’ Is Coming To Visit On Ultra Zakas OTT!)

रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे.

मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा मृत्यू होतो. फ्रँकी नावाची एक तरुण मुलगी तिच्या मित्रांना या पुतळ्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्यामागच्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. फ्रँकीच्या प्रयत्नांना यश येते की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतर कळणार आहे. रहस्यमय चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच आहे.

Share this article