साहित्य : 4-5 हिरवीगार कारली, मीठ, 3 टेबलस्पून तेल, हिंग, थोडी हळद, मोहरी, 2 चमचे मेथी दाण्याची पूड, लिंबाचा रस, 1 टेबलस्पून लाल मिरचीची भरड.
कृती : कारली स्वच्छ धुवून, पुसून त्याचे तीन-तीन उभे काप करावेत. कापलेल्या तुकड्यांना मीठ लावून दोन तास तशीच ठेवावीत. तेल गरम करून मोहरी परतून घ्यावी. तेलात हिंग व हळदीची फोडणी द्यावी. ही फोडणी गार करून यात परतलेली मोहरी, मेथी दाण्यांची पूड व लाल भरड घालावी. कारल्यामधून मिठाचे पाणी पिळून घ्यावे. ही कारली वरील मसाल्यात घोळवून घ्यावीत. वरून लिंबाचा रस पिळून घालावा आणि लोणचे मुरण्याकरिता ठेवावे.
Link Copied