गोविंदीची भाची आणि टीव्ही अभिनेत्री रागिनी खन्ना बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. अलीकडेच तिने बहीण आरती सिंहच्या लग्नाबाबत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री बहिणीच्या लग्न समारंभात सहभागी झाली होती, तिथून तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता अभिनेत्रीच्या धर्म बदलाबाबत एक आश्चर्यकारक पोस्ट समोर आली आहे.
रागिणी खन्ना बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाविषयी फारशी माहिती नाही. अशातच तिच्या धर्मांतराची बातमी समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
रागिणी खन्नाने काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने सांगितलेले की ती हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहे. यानंतर आज २ मे रोजी रागिणी खन्नाची दुसरी पोस्ट समोर आली. ज्यामध्ये तिने धर्म बदलल्याबद्दल माफी मागितली आहे. यासोबतच तिने पूर्वीची पोस्टही डिलीट केली आली आहे.
ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याबद्दल माफी मागितली
रागिनी खन्नाच्या नवीन व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक प्रसिद्ध हिंदी कथाकार दिसत आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटले की तिने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि स्वतःला कट्टर सनातनी हिंदू असल्याचे म्हटले आहे. रागिनी खन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "नमस्कार, मी रागिणी खन्ना. मला माझ्या मागील रीलबद्दल माफी मागायची आहे, त्यात मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण आता मी माझ्या मुळ धर्मात परत आले आहे आणि कट्टर हिंदू सनातनी बनण्याच्या मार्ग स्विकारला आहे."