'द ग्रेट इंडियन कपिल शो' या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल शर्मा प्रचंड फी आकारत आहे. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार तो एका एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेत आहेत. या शोसाठी त्याला जवळपास 26 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळेच कपिलची गणना टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कॉमेडियन आणि अभिनेत्यांमध्ये होताना दिसतेय. सुनील ग्रोव्हर जवळपास ६ वर्षांनंतर कपिल शर्मासोबत काम करत आहे.
शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंग हे देखील त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हा शो १९० देशांमध्ये प्रसारित होतोय. पहिल्या एपिसोडमध्ये कपिल शर्मा आणि त्याची टीम रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांच्यासोबत मजामस्ती करताना दिसली.
दुसऱ्या एपिसोडमध्ये कपिल शर्माने क्रिकेटर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मासोबत खूप धमाल केली. तिसऱ्या एपिसोडमध्ये 'अमर सिंह चमकीला' चित्रपटाची स्टारकास्ट आली होती. चौथ्या भागात आमिर खान खास पाहुणा म्हणून आला होता