Close

कांद्याचे लोणचे (Onion Pickle And Sweet Lemon Pickle)

कांद्याचे लोणचे
साहित्यः 4 मोठे कांदे, 1 लसूण गड्डा, 2 मध्यम कैर्‍या, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धी वाटी तेल, मोठा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ व साखर.
कृतीः कैर्‍या धुऊन, पुसून त्यांच्या आवडीनुसार फोडी कराव्यात. त्यांना हळद, मीठ लावून ते तुकडे उन्हात ठेवावेत. कांदे किसून घ्यावेत. लसूण सोलून ठेचून घ्यावी. कांदा, लसूण तेलात परतून घ्यावी. (कुरकुरीत करू नये.) दुसर्‍या कढईत तेल गरम करावे. त्यात हळद, तिखट, साखर, किसलेले आले घालावे. चांगले हलवावे. नंतर त्यात कांदा, लसूण मिश्रणही घालावे. शेवटी कैरीच्या फोडी घालाव्यात. नंतर थंड झाल्यावर बरणीत भरावे.

लिंबाचे गोड लोणचे (Lemon Pickle
साहित्यः 6 लिंबे, लिंबाच्या फोडींच्या निम्मी साखर, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा मीठ, आल्याचा तुकडा.
कृतीः लिंबाच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. आल्याचा वरचा भाग खरडून काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. लिंबे, आले, साखर व मीठ एकत्र करून बरणीत भरून ठेवावे. बरणीच्या तोंडाला फडके बांधून तीन-चार दिवस उन्हात ठेवावे. मुरल्यानंतर त्यात तिखट घालावे.

Share this article