रील नेहमीप्रमाणे मी instagram वर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार, गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरू होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की instagram वर ह्या रील खाली साधारण 300 च्या वर कॉमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत.
त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं का नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही, चोरांची भीती वाटते वगैरे अनेक.
https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpermalink.php%3Fstory_fbid%3Dpfbid02YmwAHix28DP771KpZpdBBZj6abKAh8Hh9jUzqzLzcVyTjQ313WdGan2jjeU1H47pl%26id%3D100075055617040&show_text=true&width=500
प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो??? इतक्या घाणेरड्या comments करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील??
आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात, आता हे प्रश्न नाहीयेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कॉमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत.कित्येक कॉमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत. कराव्या लागल्या.