बोनी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. बोनी कपूर यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. बोनी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मैदान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांचा हा चित्रपट चांगलाच धमाका करताना देखील दिसतोय.
नुकताच बोनी कपूर यांनी वयाच्या ६८व्या वर्षी अवघ्या सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल १५ किलो वजन कमी केले असल्याचे सांगितले आहे. माझ्या वाढलेल्या वजनाची आणि आरोग्याची चिंता माझ्यापेक्षा माझ्या मुलांनाच अधिक असते. जान्हवी, खुशी, अर्जुन आणि अंशुला मला सतत कॉल करतात आणि माझा फोन सतत वाजत असतो.
मी काय खाल्ले, मी हेल्दी गोष्टी खात आहे की नाही याकडे त्यांची बारीक नजर असते. माझी एक सवय आहे की, मी जवळपास सर्वच कॉलला उत्तर देतो. माझ्या मुलांच्या सतत लक्ष ठेवण्यामुळेच माझे हे वजन कमी झाले, असे ते म्हणाले.