स्पायसी ग्वावा
साहित्यः 1 लिटर पेरूचा रस, (बाजारात उपलब्ध), 1 टेबलस्पून कॅपस्किो सॉस, पाव टिस्पून लाल मिरची पूड, पाव टिस्पून मीठ, 1 लिंबाचा रस, बर्फाचा चुरा.
कृतीः एका भांड्यात सर्व मिश्रण घेऊन व्यवस्थित एकजीव करा. काचेचे ग्लास थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर या थंड ग्लासमध्ये बर्फ घालून मिश्रण ओता. थंडगार स्पायसी ग्वावा तयार आहे.
जांभळाचे सरबत
साहित्य: 20 ते 25 मोठी पूर्ण पिकलेली जांभळं, साखर, 1 ते 2 टिस्पून लिंबाचा रस, मीठ.
कृती: स्वच्छ धुतलेली जांभळं एका पातेल्यात घ्यावीत. अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. मध्यम आचेवर जांभळे 3-4 मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल. नंतर थंड होऊ द्यावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा. हा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी घेऊन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा. पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे. गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सर्व्ह करावे.