कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या क्रूर हुकूमशाहीला नमवायचंय... बास !
त्यासाठी आपण गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य भारतीयांना खरे 'अच्छे दिन' दिसावेत म्हणून काय प्रयत्न झाले? हे पाहूया.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला?- नाही.
मध्यमवर्गीयांवरचे सगळे टॅक्स माफ झाले? - नाही
बहात्तर हजारांची नोकरभरती झाली? - नाही.
बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? - नाही.
महागाई कमी झाली? - नाही.
शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले? - नाही
आशा वर्करला १० हजार मानधन मिळाले? - नाही
एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला? - नाही.
इंजिनरिंग-मेडिकलची फी माफ झाली? - नाही.
मुंबईचे शांघाय झाले, काचेसारखे रस्ते झाले? - नाही
पेट्रोल,डिझेल,गॅस ४०-५० रुपयांना मिळू लागले? - नाही.
रस्त्यावरचे टोल माफ झाले? - नाही.
प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आल्या? - नाही.
शेतीला धरणाचे पाणी मोफत मिळू लागलं? - नाही.
कापसाला, सोयाबीनला हमीभाव मिळु लागला? - नाही
तूर 9000 रुपये क्विंटल ने व्यापारी शेतकऱ्याच्या दारातुन खरेदी करू लागला? - नाही.
पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात जाऊन पीक विम्याचे पैसे देऊ लागल्या? - नाही.
महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना बंद झाल्या? - नाही.
सरकारी दवाखान्यात ताबडतोब उपचार मिळू लागले? - नाही.
शेतकऱ्यांचे लाईट बील माफ झाले? - नाही.
लेखक- कलाकार यांची मुस्कटदाबी बंद झाली? त्यांना खुलेपणाने बोलू दिलं जाऊ लागलं? - नाही.
बरं ! ठीकै. हे नाही झालं. पुर्वीचेही काही 'दुध के धुले' नव्हते, पण...
पण हे न झाल्याबद्दल पुर्वी सरकारला जाब विचारण्याचं आपल्याला स्वातंत्र्य होतं. खुलेआम रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं स्वातंत्र्य होतं. सत्ताधार्यांवर टीका करण्याचं न्यूज चॅनल्सना स्वातंत्र्य होतं. सरकारवर टीका केली म्हणून कुणाची नोकरी जात नव्हती. जात-धर्मांचं अवडंबर माजवून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधारी करत नव्हते. देवाचा वापर राजरोसपणे राजकारणासाठी केला जात नव्हता. कष्टाने कमावलेल्या नोटा घेऊन त्या बदलायला आपल्याला उन्हातान्हात उभे रहावे लागले नव्हते. पुर्वीचे राष्ट्रीय नेते गल्लीतल्या गावगुंडाप्रमाणे उथळ आणि मुर्ख विधानं करत नव्हते. तारस्वरात कर्कश्श किंचाळत नव्हते.
आपण यारदोस्तांसोबत 'सुकून की जिंदगी' जगत होतो यार. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होतं. आज राजकारणानं जगणं नासवलंय. म्हणूनच 'ते' जुने दिवस आपल्याला परत पाहीजेत. हमें नही चाहिए तुम्हारे 'अच्छे दिन'... भाड में जाओ.