Close

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर! (Bhushan Pradhan And Shivani Surve’s New Film Unn Sawali World Digital Premiere On Ott)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे.

Share this article