Close

खतरों के खिलाडीच्या १४व्या पर्वातील स्पर्धकांची लिस्ट झाली लिक (Khatron Ke Khiladi 14 Contestants List)

रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या रिॲलिटी शोच्या १४ व्या सीझनची सध्या चर्चा सुरू आहे. या शो चे निर्माते त्यासाठीच्या तयारीला लागले आहेत. सलमान खानच्या बिग बॉस १७ मध्ये हजेरी लावत रोहित शेट्टीने त्याचवेळी खतरों के खिलाडी या शोच्या आगामी पर्वाची घोषणा केली होती. त्यानंतरच शो साठीच्या कलाकार स्पर्धकांची निवड सुरू झाली होती. यावेळेस रोहित शेट्टीच्या आव्हांनांना निर्भरपणे सामोरे जाण्यासाठी अनेक स्पर्धकांची नावे समोर आली, त्यापैकी काही कलाकारांची नावे जाहिर करण्यात आली आहेत जे या शोमध्ये येऊन आपल्यातील भीतीला हद्दपार करणार आहेत. पाहुया ते कलाकार कोण असणार आहेत ते…

अभिषेक कुमार

अभिषेक कुमारने सलमान खानच्या रिॲलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पुनरागमन केले होते आणि आता त्याला रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १४ मध्ये देखील अप्रोच करण्यात आले आहे. अभिषेक हा या शोचा पहिला कन्फर्म केलेला स्पर्धक असल्याचा दावा केला जात आहे. तो शोमध्ये दिसण्यासाठी सज्ज झाला आहे.

निमृत कौर अहलुवालिया

निमृत कौर अहलुवालिया या शोची दुसरी निश्चित स्पर्धक आहे. निमृत बिग बॉस १६ मध्ये शेवटची दिसली होती. या शोमध्ये ती फिनाले वीकमध्ये पोहोचू शकली नाही.

मन्नारा चोप्रा

या यादीत मन्नारा चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. बिग बॉस १७ नंतर मन्नारा खूप प्रसिद्धी मिळवत आहे. नुकताच मन्नाराने तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

मुनावर फारुकी

मुनवर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता आहे. खतरों के खिलाडी १४ चे निर्माते मुनव्वरला त्यांच्या शोमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मुनव्वर या शोमध्ये आल्यास शोच्या टीआरपीला फायदा होईल.

एल्विश यादव

एल्विश यादवने बिग बॉस OTT 2 ची ट्रॉफी जिंकली आहे. चाहत्यांना शोमध्ये एल्विश आणि मुनाव्वर यांच्यातील संघर्ष पाहायचा आहे. असे झाले तर शोला नंबर 1 होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

मनीषा राणी

आता 36 चा आकडा मनीषा राणी आणि एल्विश यादव यांच्यात सुरु आहे. खतरों के खिलाडीमध्ये मनीषा राणी आली तर दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. मनीषा सतत एल्विशच्या विरोधात बोलत असते.

अभिषेक कुमार

मनीषा राणीचा मित्र आणि बिग बॉस ओटीटी 2 मधील अभिषेक कुमारलाही या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे. या शोमध्ये येण्यासाठी तो तयार असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत चाहतेही खूप उत्सुक आहेत.

हेली शहा

हेली शाह बऱ्याच दिवसांपासून टीव्ही स्क्रीनपासून दूर आहे. स्वरागिनी या मालिकेत ती दिसली होती. हेली आता खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. असे करून ती टीव्हीवर पुनरागमन करणार आहे.

खतरों के खिलाडी १४ कधी येणार?

खतरों के खिलाडी १४ या वर्षी जून महिन्यापासून सुरू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा शो सुनील शेट्टी आणि माधुरी दीक्षितच्या डान्स शोची जागा घेणार आहे. निर्माते लवकरच खतरों के खिलाडीची घोषणा करणार आहेत.

Share this article