Close

काजू-पिस्ता रोल आणि पनीर कॉर्न चीज बॉल्स (Kaju Pista Roll And Paneer Cheese Balls)

काजू-पिस्ता रोल


साहित्य : 1 कप काजूची पूड, 1 कप पिस्त्याची पूड, 1 चिमूट खायचा हिरवा रंग, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.
साखरेच्या पाकासाठी : अर्धा कप साखर, पाव कप पाणी, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून पुन्हा एक उकळी आणा आणि आच बंद करा. साखरेच्या पाकाचे दोन समान भाग करा. आता एका भागात काजूची पूड मिसळा आणि चांगलं मळून घ्या. साखरेच्या पाकाच्या दुसर्‍या भागात पिस्त्याची पूड आणि हिरवा रंग एकजीव करून तेही मळून घ्या. आता पिस्त्याच्या गोळ्याचे लांबट लहान रोल करा. त्यावर काजूचं मिश्रण गुंडाळून रोल तयार करून घ्या. त्यावर चांदीचा वर्ख गुंडाळून तासभर बाजूला ठेवून द्या. नंतर या रोलचे साधारण एक इंच आकाराचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.
टीप : काजू-पिस्ता रोल चार दिवस चांगला टिकतो. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

पनीर कॉर्न चीज बॉल्स


साहित्य : 200 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 100 ग्रॅम अमेरिकन कॉर्न (मक्याचे मोठे दाणे),
150 ग्रॅम किसलेलं चीज, 2 चिमूट पांढरी मिरी पूड,
10 ग्रॅम ओव्याची पानं (बारीक चिरलेली),
50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 50 ग्रॅम ब्रेडचा चुरा,
100 ग्रॅम उकडलेले बटाटे, स्वादानुसार मीठ, तळण्याकरिता तेल.
कृती : पनीर, चीज, बटाटे आणि मक्याचे दाणे व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणात ओव्याची पानं, पांढरी मिरी पूड, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम पनीर कॉर्न चीज बॉल्स चिली सॉससोबत सर्व्ह करा.

Share this article