Close

सुपरहिट कन्नड चित्रपटाची मराठी आवृत्ती ‘संजय आणि लीलाची प्रेमकहाणी’ : वर्ल्ड प्रिमियर ओटीटीवर (World TV Premier Of ‘Sanjay Leelachi Premkahani’ Streaming On OTT Soon : Marathi Version Of Superhit Kannada Movie)

लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाह संस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहचणार, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे विलक्षण दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून सुपरहिट पदार्पण झाले आहे.

Share this article