Close

पूजा हेगडे रोहन मेहराला करतेय डेट? (Is Pooja Hegde Dating Rohan Mehra)

अभिनेत्री पूजा हेगडेने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून जगभरात आपली ओळख निर्माण केली. आपल्या व्यावसायिक आयुष्याबाबत जेवढी ती उघडपणे बोलते तितकंच आपलं वैयक्तिक आयुष्य तिला खासगी ठेवायला आवडतं. अशातच पूजा हेगडे तिच्या कथित बॉयफ्रेंड रोहन मेहराबरोबर पुन्हा एकदा दिसली. वांद्रे येथे एकत्र फिरताना पापाराझींनी त्यांचे फोटोज काढले, त्या वेळेस दोघंही एकाच कारमध्ये होते.

https://twitter.com/KollyCensor/status/1774449681961300386?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1774449681961300386%7Ctwgr%5E36baeea183cb775c8cb14f3c0bb1036b13041d68%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbollywood%2Fpooja-hegde-and-rumoured-boyfriend-rohan-mehra-spotted-together-video-viral-dvr-99-4291621%2F

यावेळी पूजानं सफेद रंगाचा शर्ट, ग्रे ट्राउजर व काळे बूट घातले होते; तर रोहननं काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट व सफेद शूज, असा कॅज्युअल लूक केला होता. पूजा हेगडे गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे. रोहन दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. रोहनने २०१८ मध्ये सैफ अली खानबरोबर ‘बाजार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. रोहनचं नाव याआधी तारा सुतारियाबरोबर जोडलं गेलं होतं. तथापि, मे २०१९ मध्ये दोघे विभक्त झल्याची माहिती समोर येऊ लागली.

२०२३ मध्ये पूजा एका क्रिकेटरला डेट करत आहे आणि लवकरच ती त्याच्याशी लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आलं होतं. तथापि, अभिनेत्रीनं या अफवा खोडून त्या खोट्या असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर पूजा सलमान खानबरोबर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. आगामी चित्रपट ‘देवा’मध्ये ती शाहीद कपूरबरोबर अभिनेत्रीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. ‘देवा’ हा एक ॲक्शनपॅक्ड थ्रिलर चित्रपट आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याशिवाय पूजाचा अहान शेट्टीबरोबर ‘सनकी’ चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Share this article